Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावपोलिस कर्मचा-याला जातीवाचक शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण

पोलिस कर्मचा-याला जातीवाचक शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव येथे पोलिस कर्मचा-याला जातीवाचक शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण करणा-या विठ्ठल उर्फ भावेश भगवान पाटील व सागर विठ्ठल पाटील या दोघांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की भडगाव पोलिस स्टेशनला हे. कॉ. विजय धर्मा जाधव हे नेमणूकीस असून, त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ते कर्तव्यावर असतांना विठ्ठल भगवान पाटील व सागर विठ्ठल पाटील या दोघांनी त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली व तू कसा आहेस तुझा सर्व इतिहास मला माहिती आहे… वगैरे बोलत चार चौघात शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मी तुमच्या डिपार्टमेंटच्या व्हिडिओ माझ्या मोबाईलमधे रेकॉर्डींग केल्या आहेत. बघ आता तुला कसा फसवितो, तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करतो असे म्हणत दोघांनी हे.कॉ. जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. सागर पाटील याने हे कॉ. जाधव यांना भडगाव शहरात कुठेही भेटला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व शर्ट फाडला.या स्वरुपाच्या दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख करत आहेत. या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या