Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापोलीस शिपाई ललिता साळवे यांनी केलेले लिंगबदल यशस्वी; साळवे आणि पत्नी सीमा...

पोलीस शिपाई ललिता साळवे यांनी केलेले लिंगबदल यशस्वी; साळवे आणि पत्नी सीमा साळवे यांच्या घरी बाळाचे आगमन…!

बीड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- बीड जिल्ह्यातील पोलिस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया (२०१८) झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा झाला असल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई आणि बीड जिल्ह्यातील ललिता साळवे यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर ललित साळवे झाले होते. ३६ वर्षीय ललित साळवे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी २०२० मध्ये लग्न केले होते. आता १५ जानेवारी रोजी ललित साळवे वडील झाले असल्याची बातमी समोर येत आहे. साळवे दाम्पत्याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. साळवे दाम्पत्याने या मुलाचे नाव आरुष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझा महिला ते पुरूष असा प्रवास हा खूपच संघर्षमय होता. या काळात अनेकांनी मला सहकार्य केलं. आम्हाला बाळ व्हावं, ही पत्नी सीमाची इच्छा होती. आता आम्ही एका गोंडस मुलाचे माता-पिता झालो आहोत, याचा मला आणि आमच्या कुटुंबियांना आंत्यतिक आनंद होत आहे.आणि पोलीस शिपाई ललिता साळवेचा ललित साळवे झाला.

जून १९८८ साली बीडमध्ये जन्म झालेल्या साळवे यांनी पदवीचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ते पुरुष असल्याचे कळले. साळवे जन्मत:च मुलगा म्हणून जन्माला आले होते. मात्र त्यांची जननेंद्रिये विकसित न झाल्याने ते स्त्रीप्रमाणे भासत होते. त्यामुळे घरामध्ये मुलगी समजूनच त्यांना वाढविण्यात आले. साळवेंची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलाचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या