भादली बु. | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत आज मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.१५ ते ११.४५ या वेळेत भादली बु. येथील श्रीमती मीरा महाजन विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, गुड टच-बॅड टच संकल्पना तसेच पोलीस काका-पोलीस दीदी या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुरक्षितता, शिस्त व कायद्याचे पालन याबाबत सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक चेतन गाजरे, सेक्रेटरी उमाकांत जावळे, नीलिमा बाविस्कर, संचालक गोपाळ ढाके तसेच पोलीस पाटील राधिका ढाके उपस्थित होते.कार्यक्रमास १२५ ते १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


