जळगाव/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह :- रामानंदनगर पोलीस स्टेशनचे ग्रेडेड पोलीस उप निरीक्षक गौतम सांडू केदार ( वय 54 ) यांचे काल रोजी गजानन हार्ट हॉस्पिटल जळगाव येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले आहे. श्री.गौतम केदार हे कर्तव्यार्थ असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला..ते सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार सांडू धनजी केदार यांचे चिरंजीव तर पीएसआय मिलिंदअण्णा केदार यांचे लहान बंधू होत. ते चाळीसगाव तालुक्यातील खेडेगाव येथील मूळ रहिवासी होत.
त्यांच्या अचानक जाण्याने केदार कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी काल सायंकाळी 8 वाजता नेरी नाका स्मशानभूमीत पार पडला ,तेव्हा वैकुंठधाम येथे बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.. अनेक पोलीस अधिकारी ,पोलीस कर्मचारी ,आप्तेष्ट मंडळी ,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता..