नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी अवयवदान विषयक जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा जैन, डॉ. गौरव जाधव व डॉ. अजय पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली संपन्न झाली. रॅली दरम्यान नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी ३५ लाभार्थ्यांची क्यूआर कोडद्वारे अवयवदानासाठी नोंदणी करण्यात आली.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आरोग्य केंद्राच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव, डॉ. करिष्मा जैन व डॉ. अजय पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्ती व अवयवदान यासाठी शपथ घेतली. तसेच उपस्थितांनी क्यूआर कोड स्कॅन करून अवयवदानासाठी नोंदणीही केली.

