Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeक्राईमप्रेमसंबंधातून दोन भावंडांवर कारने जीवघेणा हल्ला.

प्रेमसंबंधातून दोन भावंडांवर कारने जीवघेणा हल्ला.

उदळी बुद्रुकमध्ये धक्कादायक घटना ; आरोपी पोलिस कोठडीत.

रावेर-सावदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्रेमसंबंधाच्या वादातून उदळी बुद्रुक शिवारात मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास कारने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत दोन भावंड गंभीर जखमी झाले असून, आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी गौरव पाटील (रा. रावेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा धाकटा भाऊ कुणाल याचे आरोपी गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील (रा. उदळी बु.) यांच्या भावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात धरून आरोपीने पांढऱ्या रंगाच्या कारने जाणीवपूर्वक धडक दिली. गौरव आणि कुणाल हे मोटारसायकलवरून शेतात जात असताना आरोपीने समोरून कार धडकवली. यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यानंतर आरोपीने कार रिव्हर्स घेत दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जखमींना तातडीने फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या आशिर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गौरव पाटील यांचा उजवा हात मोडला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल शिवाजी सानप करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या