Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावप्रोऍक्टिव्ह राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत श्रवण अबॅकसचा विद्यार्थी तेजस धांडे देशात पहिला...

प्रोऍक्टिव्ह राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत श्रवण अबॅकसचा विद्यार्थी तेजस धांडे देशात पहिला…

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन 2023-24 मध्ये नशिराबाद येथील श्रवण अबॅकस चा विद्यार्थी तेजस अविनाश धांडे हा तिसऱ्या लेवल मध्ये पहिला आला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील विद्यार्थी सहभागी होते.

श्रवण अबॅकस क्लासेस मिळवतय सातत्याने यश…

याआधी धुळे येथे झालेल्या रिजनल स्पर्धेत श्रवण अबॅकस च्या 15 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. कोल्हापूर येथील अबॅकस स्पर्धेत श्रवण अबॅकस चे एकूण 8 विद्यार्थ्यांना रँक मिळाली. तेजस धांडे, आदित्य साळी, हेतल महाजन, श्लोक पाटील, मानसी सोनवणे, चित्राली पाटील, भाविका सैतवाल, सायली जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

श्रवण अबॅकस चे संचालक श्री हरीष पाटील सर यांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या