Saturday, February 28, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याप्रा. माधुरी पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान ; माध्यमिक स्तरावरील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या...

प्रा. माधुरी पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान ; माध्यमिक स्तरावरील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांवरील संशोधनाची दखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील रहिवासी तथा छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. माधुरी देविदास पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा. पाटील यांनी आंतरविद्या शाखेतील शिक्षणशास्त्र विभागांतर्गत “माध्यमिक स्तरावर स्काऊट-गाईड विषयाचे विद्यार्थी व सामान्य विद्यार्थी यांच्यातील नैतिक मूल्ये व समायोजन यातील सहसंबंधाचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांच्या अभ्यासातून स्काऊट-गाईड उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या नैतिक जडणघडणीवर, सामाजिक बांधिलकीवर व व्यक्तिमत्व विकासावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.या संशोधनासाठी त्यांना भुसावळ येथील पी. ओ. नहाटा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रमोद अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच त्यांचे वडील माजी मुख्याध्यापक डी. एल. पाटील यांच्यासह कुटुंबीयांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
प्रा. माधुरी पाटील यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या