जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षात लाईव्ह:- कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 2025 प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये नशिराबाद येथील श्रवण अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी अत्युत्तम कामगिरी केली असून विद्यार्थी तेजस धांडे याने सलग दुसऱ्यांदा प्रथम स्थान मिळविले. त्याने आपले कौशल्य सिद्ध करून यश संपादन केले आहे.
या 2025 प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये श्रवण अबॅकस नशिराबाद चे एकूण दहा विद्यार्थी रँक मध्ये आले, जे संस्थेच्या कौशल्याची आणि मेहनतीची प्रचिती देणारे आहे. यामध्ये तेजस धांडे, ट्विंकल राजपूत, चित्राली पाटील, रोहित शिरसाळे, देवयानी चौधरी, मानसी सोनवणे, पार्थ माळी, सार्थक धनगर, भावेश सोनवणे आणि धनश्री पाचपांडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी अत्युत्तम अबॅकस कौशल्याचा दाखला देत स्पर्धेत उच्च स्थान मिळवले. यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी अबॅकसच्या मानसिक गणनाचा वापर करत आपली अचूकता आणि जलद गणिती कौशल्य दाखवले.श्रवण अबॅकस नशिराबाद चे संचालक श्री हरीश पाटील आणि सौ वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “हा विजय विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा परिणाम आहे,” असे संचालकद्वयंनी सांगितले.
शाळेचे शिक्षक आणि इतर विद्यार्थी देखील या यशाने अभिमानित झाले आहेत. “आमच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करून श्रवण अबॅकस नशिराबादचे नाव गौरवले आहे. यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल,” असे प्रशिक्षकांनी सांगितले.