Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeहवामानपुढील 24 तासांत या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; दिलासा मिळणार..

पुढील 24 तासांत या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; दिलासा मिळणार..

पुणे /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचे चटके जाणत आहेत. दरम्यान, राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.यामुळे येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दहा दिवस राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर तापमानामध्ये घट होऊन थंडीला सुरूवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रासह कोल्हापूर, कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे.काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या