Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeहवामानपुढील ४८ तासात मुसळधार पाऊस...! तर पहा कोणत्या जिल्ह्यात...

पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस…! तर पहा कोणत्या जिल्ह्यात…

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून येत्या पुढील ४८ तासांत म्हणजेच येत्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. कमी दाबाच्या पट्या मुळे महाराष्ट्रात पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या मुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. या तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई व पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असून या जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. श्रीगणेशाच्या आगमनाने वरूणराजा प्रसन्न होवून जोरदार पाऊस येईल, अशी आशा राज्यातील शेतकरी वर्गाला लागून आहे.नुकताच हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून. दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला होता. तसेच २१ सप्टेंबरपासून मुंबई पुण्यासह कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या