भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका, समाजसेविका व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व सौ. पुनम विजय फालक यांना इचलकरंजी येथील भव्य शाहू महोत्सवात मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवी साहेब रजपूते माजी उपनगराध्यक्ष, प्राचार्य डॉ. त्रिशला कदम, अध्यक्ष सौ. अक्षरा कांबळे, अरुण रंजना कांबळे, संतोष निकम, प्रमोद अंदुरकर, स्वप्निल गोरंबेकर व तेजस्विनी राजपूत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी संकल्पना प्रमुख अरुण रंजना कांबळे यांनी सौ. पुनम फालक यांच्या सोळा वर्षांच्या उल्लेखनीय कारकीर्दीचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे कौतुक केले. नुकताच मिळालेल्या आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दलही सभागृहातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नारीरत्न पुरस्कार स्वीकारताना पुनम फालक यांच्या डोळ्यात उमटलेले आनंदाश्रू क्षणभर सभागृह भारून गेले. या वेळी स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरपर्सन कांचन नेमाडेही उपस्थित होत्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना सौ. फालक म्हणाल्या की, “हा गौरव माझा नसून माझ्यावर प्रेम, विश्वास व साथ देणाऱ्या असंख्य मित्र-मैत्रिणी, परिवार व माझ्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते.” आजवरच्या त्यांच्या कार्यातून हजारो विद्यार्थी घडले असून अनेक जण उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा हा योग्य सन्मान असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, महेश फालक, विष्णूभाऊ चौधरी, संजय नाहाटा यांच्यासह नाहाटा कॉलेजचे प्राचार्य प्रा. बि. एच. बर्हाटे, भोळे कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, नगरसेवक पिंटू कोठारी, माधुरी फालक, कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, मनोज पाटील, दिनेश पाटील तसेच तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निना कटलर, उपप्राचार्या, सर्व शिक्षक-कर्मचारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सौ. पुनम फालक यांच्या या मानाच्या तुऱ्यास त्यांच्या यजमान विजय फालक, सुपुत्र जय व सुपुत्री लावण्या यांनीही अभिवादन करत अभिमान व्यक्त केला. सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

