पुणे/ धिरज ठाकूर/ पोलीस दक्षता लाईव्ह:- पुण्यात अलीकडेच झालेल्या कुख्यात गुन्हेगाराच्या एन्काऊंटर प्रकरणावर पुणे पोलिसांकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. पोलिस मुख्यालयात आयोजित या परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित गुन्हेगारावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष सापळा रचला होता. मात्र, प्रतिकार केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारावर खून, जबरी चोरी, खंडणी आणि शस्त्रसाठा अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. “ही कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली असून संपूर्ण तपशील तपासात उघड होईल,” असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून घटनास्थळाचा फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि CCTV फुटेज तपासण्यात येणार आहेत.पत्रकार परिषद पुणे पोलिसांच्या अधिकृत YouTube आणि Facebook पेजवर थेट दाखवली गेली आहे. नागरिकांनी अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.