जळगाव/प्रतिनिधी/पोलिस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साजरा झाला.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना जळगाव यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीचा कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या स्मृतीस आमदार राजू मामा भोळे यांनी उजाळा दिला.
कार्यक्रमावेळी दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष भाऊ सोनवणे, मांगल्य वधुवर सूचक केंद्राचे प्रभाकर न्हाळदे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषराव करे, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा धनगर, अहिल्या महिला संघाच्या विभागीय अध्यक्ष मंजुषा सूर्यवंशी, अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष प्रमिला कंखरे , जळगाव मनपाचे माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंतराव भालेराव, रमेश सुलताने, विष्णू ठाकरे, रिदम इरिगेशन कंपनीच्या वतीने पी. एस. सोनवणे, जळगाव मनपाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, वसुंधरा लांडगे, एडवोकेट ऋषी राव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर फासे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश बागुल,कृषी उत्पन्न बाजार समिती जळगावचे संचालक समाधान धनगर , सामाजिक कार्यकर्ते गणेश जाने, अविनाश भालेराव उपस्थित होते.