पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पिंपळे निलख येथे धानेश शर्मा नामक एका इसमाने घरासमोरच्या रिकाम्या जागेत गांजाची झाडे लावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरोपी धानेश अनिरुद्ध शर्मा हा एका भाड्याच्या चाळीत राहतो. त्याने राहत असलेल्या घरासमोर चाळीतील त्याच्या राहत्या खोलीसमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडे आणि झुडपे आहेत, तेथे त्याने गांजाची दोन झाडे लावलेली सापडली. अमली विरोधी पथकाने १२ किलो ४६२ ग्रॅम गांजाची झाडे जप्त केली असून याची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याठिकाणी शर्मा याने गांजाची दोन झाडे लावली होती. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच त्याच्या घरी जाऊन कारवाई करत शर्मा याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची गांजाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत. धानेश शर्मा हा फर्निचरचे काम करीत असून तो पिंपळे निलख येथे एका चाळीत राहत आहे. त्याने हे कशासाठी केले याचा तपास पोलीस करत असून, त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत याचा पुढील तपास सांगवी पोलीस अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे करीत आहेत.