Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमममुराबाद पेट्रोल पंप नजीक पॅजो रिक्षा- दुचाकीच्या अपघातात जळगावचा व्यक्ती ठार

ममुराबाद पेट्रोल पंप नजीक पॅजो रिक्षा- दुचाकीच्या अपघातात जळगावचा व्यक्ती ठार

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगावात सध्या सर्वत्र लहान मोठे अपघात वाढले आहेत.भरधाव पॅजो रिक्षासह दुचाकीची समोरासमोर धडक झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबादजळील पेट्रोलपंपासमोर घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील पार्वतीबाई ओकनगरात विजय कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजय कोळी हे (एमएच १९ एवाय ७९०५) क्रमांकाच्या दुचाकीने विदगावहून जळगावकडे जाण्यासाठी निघाले. तर ममुराबाद येथून (एमएच १९ व्ही ३६४२) क्रमांकाची पॅजो रिक्षा मजूरांना घेवून यावलकडे जात होती. ममुराबादजवळील फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळतच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विजय कोळी यांना नागरिकांच्या मदतीने एका वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ , पुतणे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या