Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस बरसला ; काही जिल्ह्यात ' यलो अलर्ट '..!

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस बरसला ; काही जिल्ह्यात ‘ यलो अलर्ट ‘..!

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह

ऑगस्ट महिन्यात पाऊस नव्हता. यामुळे आता पावसाची सर्व अपेक्षा सप्टेंबर महिन्यावर आहे. परंतू सप्टेंबर महिन्याच्या पहिले दोन, तीन दिवस पावसाचा जोर नव्हता. आता कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस परतला आहे.यामुळे दिलासा मिळाला आहे.तब्बल ४० दिवसांपासून पाऊस झालेला नाही,याचा परिणाम पिकांवर ,तलाव ,नाले ,विहिरींची पातळी यावर झाला आहे. पुढील आठवड्यात पाऊस जोर धरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसावर राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा मोठा खंड पडला. पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘ यलो अलर्ट ‘ दिला आहे.

वरूणराजा रूसल्याने शहर व परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. पावसाच्या थेंबाला आसुसलेल्या शहर व परिसरात चाळीस दिवसांच्या खंडानंतर गुरुवारी (ता.७) सायंकाळी हलक्याशा पावसाने हजेरी लावली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या