नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षात लाईव्ह:- दिनांक 1 मार्च 2025 रोजी शनिवार सायंकाळी 6 वाजता श्री. शिवाजी राजे जाधव (लखोजीराव जाधव यांची वंशज शिंदखेड राजा )यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचे योजिले आहे तरी सर्व शिव प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.गणेश चव्हाण यांनी केले आहे.
दिनांक एक मार्च 2025 शनिवार रोजी नशिराबाद येथे होणाऱ्या या महानाट्य प्रसंगी महिलांसाठी ११ पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी
या कार्यक्रमामध्ये महिलांना मराठमोळ्या पोशाख स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये महिलांनी मराठमोळी वेशभूषा करून कार्यक्रमाच्या ठिकाणी संध्याकाळी ठीक सहा वाजता यायचे आहे यामधून लकी ड्रॉ पद्धतीने निवडून येणाऱ्या११ महिलांना समारंभामध्ये कार्यक्रमाचे दिग्दर्शक हास्य जत्रा प्रेम श्री.हेमंत दादा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम संपल्यावर नशिराबाद ला कार्यक्रमाच्या ठिकाणी ११ पैठणीचे वितरण करण्यात येईल.
महिलांनी मराठमोळा पेहराव असावा
यात १५ वर्षे वयाच्या वरील मुली व महिला भाग घेऊ शकतात.
हे करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण महिलांमध्ये मुलींमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे. मराठमोळा पोशाख राहणीमान संस्कृती आपली पुढील पिढी विसरत चालले की काय यासाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.
शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा इतिहास
नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे 100 फूट लांब स्टेज 52 फूट उंच आणि 35 फूट रुंद अशा भव्य दिव्य किल्ल्याच्या सेटवर घोडे उंट बैल जोडी यांच्यासहित 170 च्या वर कलाकारांना घेऊन शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा इतिहास राजा रयतेच्या महानाट्यात दाखवण्यात येणार आहे हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे.
अतिशय भव्य दिव्य असे आपल्या राजाचे खूप छान व सुंदर महानाट्य आयोजित केले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री गणेश चव्हाण यांनी केलेले आहे
स्थळ – पार्वती नगर सुनसगांव रोड नगर परिषद जवळ नशिराबाद/ जळगांव