Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराजापूर येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

राजापूर येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

धर्माबाद | गंगाधर हणमंते | पोलीस दक्षता लाईव्ह :-
धर्माबाद तालुक्यातील मौजे राजापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्यक्रमांचे स्वरूप अधिक व्यापक ठेवण्यात आले असून एक दिवसाने यात्रेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २३ जानेवारी २०२६ रोजी महालक्ष्मी मंदिरात महाआरती होणार असून, मध्यरात्री ठीक बारा वाजता माता लक्ष्मी देवीची गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी रात्रभर भजन, कीर्तन व जागरणाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात्रेच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेली भव्य कुस्त्यांची दंगल दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कुस्तीसाठी मराठवाड्यासह विविध भागांतून हजारो नामांकित पैलवान राजापूर येथे दाखल होत असून, कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजापूर यात्रा समितीच्या वतीने अधिकाधिक पैलवानांनी व नागरिकांनी या कुस्ती दंगलीचा व यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या