Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात भीषण अपघात ; अमळनेर तालुक्यातील मांडळचे सहा जणांचा मृत्यू..!

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात भीषण अपघात ; अमळनेर तालुक्यातील मांडळचे सहा जणांचा मृत्यू..!

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर-महाराष्ट्रासह इतर राज्यातही अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले जैसलमेर येथे फिरायला जात होते. असताना कंटेनरला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे वय (५५) रा. बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा. पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्र. एम.एच०४. ९११४ ने राजस्थान येथे फिरायला जात असताना १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरने धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची मुलगी (नाव माहीत नाही), गायत्री योगेश साळुंखे (३०), प्रशांत योगेश साळुंखे (७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (१) यांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात झाल्याने राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातील डोरीमना गावातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले होते अशी माहिती मिळाली आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

धोरिमान्ना पोलीस स्टेशनचे अधिकारी सुखराम बिश्नोई यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एक कुटुंब कारमधून जैसलमेरला जात होतं. दरम्यान, बाडमेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६८ वर सुरते की बेरीजवळ ट्रेलर आणि कारमध्ये धडक झाली. सोमवारी, (१३ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या ,रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू ओढवला आहे.

पुनर्वसन व मदत कार्य मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बोलणे केले.त्यानुसार अपघात स्थळी लवकर मदत झाली तसेच रुग्णालयात जखमींना हलविण्यात आले आहे.

दरम्यान या अपघातामुळे मांडळ गावात ऐन सण उत्सवात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या