जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू विक्रीविरुद्ध तिघा ठिकाणी एकत्रित कारवाई केली आहे. दि. 01 आणि 03 जुलै 2025 रोजी जळगाव, कानळदा आणि ऐनगाव येथे झालेल्या या कारवाईत विविध प्रकारच्या दारूच्या सुमारे ९५ लिटर दारू आणि मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 01 जुलै रोजी कानळदा (ता. जळगाव) येथे एकूण 3 गुन्हे नोंद झाली असून त्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गावठी दारू ७० लिटर, देशी दारू २.७ लिटर, विदेशी दारू ४.८६ लिटर, बिअर ४.५ लिटर असा एकूण १३,९७५/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत दि. 03 जुलै ऐनगाव (ता. बोदवड) येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात 1 आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी दारू १३.५ लिटर असा एकूण 6000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले की, या कारवाया अवैध दारू विक्रीच्या तक्रारीनुसार करण्यात आल्या असून प्रशासन नेहमीच कायद्याची अंमलबजावणी करण्यात कटिबद्ध आहे.