मुंबई / प्रतिनिधी:- महाराष्ट्रात पुन्हा चिंता वाढत चालली आहे.कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन. १ ‘ ने देशभरात पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ११ नव्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत, कोरोनाने आता पुन्हा देशासह राज्यात डोके वर काढले आहे. आता JN1 हा नवा व्हेरिएंट उदयास आला आहे. पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.यावेळी कोरोनाचा JN1 हा नवा व्हेरिएंट आढळून आला असून दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे .या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या नुसार जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यंत्रणाना सुद्धा अलर्ट राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
JN1 जेएन-वन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्रणा देखील अलर्ट कारण्यात आली आहे. या रुग्णासाठी जीएमसीमध्ये १०० बेड व ५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांनंतर आवश्यकतेनुसार अधिक सुविधा वाढविण्यात येतील अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जेएन – वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला असला तरी जळगाव जिल्ह्यात अजून तरी या व्हेरिएंटचा रुग्ण मिळून आलेला नाही तरीही काळजी म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्टमोड आहेत.
कोरोनाचा हा उपप्रकार वाढू नये म्हणून राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे.