राज्यात ८२४ आणि मुंबईत १६३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण
मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत नवीन आकडेवारी नुसार राज्यात ८२४ रुग्ण बाधित असून १४४ रुग्णांची महामुंबईत नव्याने नोंद झालेली आहे.
गुरुवार पर्यंत राज्यात १४४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात असून, काही दिवसांपासून राज्यामध्ये नवीन रुग्ण मिळून येत आहे.यात मुंबई शहरातील एकूण २९ रुग्ण आहेत.तर आतापर्यंत राज्यभरात ८२४ आणि एकट्या मुंबईत १६३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर त्यातील १६९ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
मुंबईतील २९ रुग्णांपैकी १ रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत सध्यस्थितीत कोरोना करीता ४२१५ बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी २० बेड् वर रुग्ण दाखल आहेत. काल दिवसभरात ७६८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महामुंबईती नव्याने नोंद झालेले रुग्ण
मुंबई मनपा – २९, ठाणे -१, ठाणे मनपा – ९, नवी मुंबई मनपा – २०, कल्याण डोंबिवली – ४, उल्हासनगर मनपा – १, रायगड -१, पालघर -१, पनवेल मनपा – २