मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीवर इच्छुकांना १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.यानंतर, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा आवश्यक तो विचार करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने मतदार यादी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने आयोगाने सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये मतदारांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.