जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत 3 कि.मी. गटात जळगाव येथील कुमारी अक्षरा योगेश वराडे हिने सातवा क्रमांक पटकावला आहे.अक्षरा ही जळगाव येथील ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिच्या या यशात एकलव्य क्रीडा ग्रुप मधील वैभव सोनवणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. वडील योगेश वराडे नशिराबाद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून, त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे अक्षरा हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत जळगाव येथील अक्षरा वराडे हिने पटकावला सातवा क्रमांक
RELATED ARTICLES