Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावरक्षाबंधसाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाच्या मोटारसायकलला बसची धडक

रक्षाबंधसाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाच्या मोटारसायकलला बसची धडक

चोपडा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रक्षाबंधन निमित्ताने बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाच्या मोटारसायकलला वाटेतच बसने धडक देऊन गंभीर अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नपिंप्री येथील रहिवासी रोहित मराठे हा रक्षाबंधन निमित्ताने आपल्या बहिणीला घेण्यासाठी तिच्या सासरी नारणे येथे जात होता.नारणे फक्त दहा किलोमीटर असताना सावखेडा फाट्याजवळ असलेल्या देव हॉटेलच्या आसपास सकाळी अंदाजे साडे नऊ ते दहाच्या दरम्यान अमळनेरकडून चोपडाकडे जाणार्‍या अनुक्रमे निळ्या व लाल रंगाच्या दोन बसेस एकामागून एक भरधाव जात होत्या. मागची गाडी पुढच्या बसला ओव्हरटेक करीत असताना बसचा मागील भागाने रोहितला जोरदार धडक दिली.या अपघातामध्ये रोहितची मोटरसायकल पडून त्याचा गंभीर अपघात झाला. त्यात तो पूर्णतः घाबरून गेला.बसेसचा नंबर मात्र त्याला घेता आला नाही. या घटनेची माहिती मिळताच त्याचे पाहुणे आणि बहिणीची सासू घटनास्थळी जाऊन पातोंडा येथील खाजगी दवाखान्यात आले. रोहित मराठे याच्या पावाला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णवाहिका करून अमळनेर जाण्याचा सल्ला दिला.अकरा वाजता अपघातग्रस्त रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आले असता दवाखाना बंद होता.डॉक्टर व कोणताच आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हता.कैलास बिरारी यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका मागवून पुढील उपचारासाठी अमळनेर पाठविण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या