Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावदोन दुचाकी चोर रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात ; ०३ चोरीच्या दुचाकी जप्त

दोन दुचाकी चोर रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात ; ०३ चोरीच्या दुचाकी जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणात गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.किरण मधुकर सुर्वे (रा. मारोती पार्क, शिव कॉलनी) हे दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची अंदाजे ६० हजार रुपये किमतीची एमएच-१९-एवाय-१७९७ क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन पिंप्राळा बाजारात गेले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक ०५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विक्की नंदलाल भालेराव (वय २९, रा. शंकर आप्पा नगर, पिंप्राळा, जळगाव) व महेश राजेंद्र मेढे (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांची हिरो स्प्लेंडर, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हिरो स्प्लेंडर प्रो तसेच एक हिरो डिलक्स अशा एकूण तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपींच्या ताब्यातून एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीत पोनि. राजेंद्र गुंजाळ, पोउपनि. सचिन रणशेवरे, पोह. जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी व योगेश बारी यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशान्वये पोह. जितेंद्र राजपूत हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या