Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमाजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली महापौर जयश्री...

माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली महापौर जयश्री महाजन यांची भेट..; राजकीय चर्चेला उधाण…!!

जळगाव/ विशेष प्रतिनिधी -: माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ,जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे जळगावात आगमन झाले..त्यांनी प्रारंभी महापौर जयश्रीताई महाजन ,महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनीलभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.पवार यांनी मेहरूणमधील निवासस्थानी आल्यानंतर दोघांशी संवाद साधला. याप्रसंगी महाजन दाम्पत्याने छत्रपती शिवरायांची देखणी मूर्ती आणि चांदीची गदा देऊन भेट दिली. तसेच गुलाबापुष्पांचा भला मोठा हार घालून ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात भव्य-दिव्य स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रदेशाध्यक्ष व माजी अर्थमंत्री जयंत पाटील ,माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , माजी महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील , माजी मंत्री गुलाबराव देवकर,ऍड.रवींद्र पाटील , वैशाली सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) ,काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह मेहरूणवासीयांची गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असल्याचे दृश्य दिसून आले.या देखण्या सोहळ्याचे आपल्या पहाडी व बहारदार आवाजात सुप्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे यांनी सूत्रसंचालन केले.. त्यांनी केलेल्या शेरोशायरीला उपस्थित प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.कार्यक्रम स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या