अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी येथील तिलोत्तमा पाटील यांची नियुक्त झाली आहे.नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या ३२ वर्षे सक्रिय राजकारणात असलेल्या आणि तालुका ते राज्य पातळीवर विविध पदांचा तसेच कामकाजाचा अनुभव असलेल्या अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सदर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते आजतागायत पक्षाशी एकनिष्ठ तसेच प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.