नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जळगाव तालुक्यातील महिला उपाध्यक्षपदी नशिराबादच्या आशाताई महाजन यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती प्रक्रिया पार पडली. कार्यक्रमात तालुकाध्यक्ष साधनाताई पाटील, महिला तालुका कार्याध्यक्ष आशाताई चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते आशाताई महाजन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नशिराबाद शहराध्यक्ष गणेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बरकत अली यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.