जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष श्री. नितीन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मनोज वासुदेव नाले यांची जळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीद्वारे संघटनेच्या जळगाव तालुक्यातील कार्याला अधिक गती मिळणार आहे.
नियुक्तीप्रसंगी जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री.कृष्णा पाटील तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ जळगाव जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या तालुका अध्यक्ष मनोज नाले यांनी संघटनेच्या विचारधारेनुसार समाजातील मागासवर्गीय घटकांच्या हक्क, आरक्षण, शिक्षण व रोजगार विषयक प्रश्नांसाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांवरून मनोज नाले यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महासंघाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.