Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशैक्षणिक सहल भव्य व यशस्वी ; ज्ञान, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा प्रवास!

शैक्षणिक सहल भव्य व यशस्वी ; ज्ञान, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा प्रवास!

रावेर (चिनावल) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२५ रोजी द्विदिवसीय भव्य शैक्षणिक सहलीचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती व विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने राबविण्यात आलेली ही सहल विद्यार्थ्यांसाठी समृद्ध व अविस्मरणीय ठरली.

सहलीदरम्यान भद्रा मारुती, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, संत एकनाथ महाराज समाधीस्थळ, पैठण येथील मंदिरे, संत ज्ञानेश्वर उद्यान, सिद्धार्थ गार्डन तसेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे इतिहास, कला, वास्तुकला आणि संस्कृती यांची सखोल ओळख करून घेतली.सहलीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसद्वारे सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सहलीचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय सुनील भास्कर महाजन, चेअरमन खेमचंद गोवर्धन पाटील व संचालक विनायक कमलाकर महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

संपूर्ण सहलीचे मार्गदर्शन व नेतृत्व मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांनी केले. नियोजनात उपशिक्षिका हर्षाली कोल्हे, सपना टोके, कविता नेमाडे तसेच उपशिक्षक संतोष काळे, मिलिंद गारसे, नितीन महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मण कुरकुरे आणि योगेश बोरोले यांचीही सहकार्यपूर्ण उपस्थिती लाभली. एस.टी. चालक प्रदीप सूर्यवंशी यांनी सुरक्षिततेची परिपूर्ण काळजी घेत प्रवास सुरळीत पार पाडला.सहलीत विद्यार्थ्यांनी आदर्श शिस्त, जबाबदारी व समूहभाव प्रकट केला. या उपक्रमासाठी परवानगी देऊन सहकार्य केलेल्या पालकांचे मुख्याध्यापकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धी, सामाजिक बांधिलकी, संस्कृतीची ओळख आणि प्रत्यक्ष अनुभूतीचा समृद्ध असा अविस्मरणीय अनुभव ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या