जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व युवराज पद्माकर महाजन यांच्या वतीने रावेर येथे आयोजित ३४ वी “आमदार चषक” कबड्डी स्पर्धा २०२३-२०२४ स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.
जळगाव जिल्ह्यातील मुलांचे ४० संघ आणि मुलींचे १० संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. खेळाडू मोठया उत्साहात खेळतांना दिसून आले. या स्पर्धेच्या युगात आपल्या परिसरातील खेळयातील उत्कृष्ट खेळाडू समोर आले पाहिजे, जेणेकरुन ते राज्य पातळीवर, देश पातळीवर खेळू शकतील त्यासाठी अश्या स्पर्धा आयोजित करणे खूप महत्त्वाचे आहे.
सर्वप्रथम जिल्हा कबड्डी असोसिएशनला धन्यवाद देईल त्यांनी रावेर शहरात स्पर्धा आयोजित करण्याचा मान दिला ,असे गौरवोद्गार आमदार शिरीष चौधरी यांनी काढले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेंद्रसिंग ठाकूर (शेरा भैय्या) जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गणवाणी, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील,उपसभापती योगेश पाटील, श्रीराम दयाराम पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य योगेश सोपान पाटील, तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, भास्कर पहेलवान,कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश महाजन, सोपान साहेबराव पाटील,जे.के. पाटील जीजाबराव चौधरी,सुभाष वानखेडे,रावेर काँग्रेस शहराध्यक्ष कलिंम शेख,युवराज माळी,धनंजय चौधरी भुपेश जाधव, संतोष पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.