Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावरायपूर येथील दोघा भावांवर धारदार शस्त्राने वार करणारे...दोघं आरोपी अटकेत..

रायपूर येथील दोघा भावांवर धारदार शस्त्राने वार करणारे…दोघं आरोपी अटकेत..

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव तालुक्यातील रायपूर येथील ही घटना असून दि.२८ रोजी च्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रायपूर येथे राहणाऱ्या एकाने मोटारसायकल हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने दोघांनी चाकूने हल्ला करून दोन भावांना जखमी केल्याची घटना घडली असून याबाबत एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत तात्काळ दोन आरोपीना अटक केली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रायपूर येथे राहत असलेला तरुण चटई कामगार मिथुन फकीरा परदेशी वय (२५ वर्ष)असून दि.२८ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मिथुन याच्याच गावातील दुर्गेश कैलास परदेशी व श्रीकांत मोहन धनगर यांनी मिथुन याच्या घरासमोरून दोन तीन वेळा मोटारसायकलवर चकरा मारल्या. याचा जाब विचारत मिथुन याचा भाऊ विशाल याने कशाला चकरा मारता आहे कोणाला धक्का लागला तर असे बोलताच त्यांनी मोटार सायकल बाजूला उभी करुन तुम्हाला जास्त माज आला आहे असे म्हणत देऊन शिवीगाळ केली. तसेच मिथुन याने त्यांना गाडी हळु चालविणे बाबत सांगत असतांना तुम्ही शिवीगाळ कशी करता असे बोलताच श्रीकांत मोहन धनगर याने त्याच्या कमरेतून चॉपर काढून मिथनच्या पाठीच्या मध्यभागावर, तसेच उजव्यां बाजूच्या कमरेवर चॉपर मारून जखमी केले. तसेच दुसरा आरोपी दुर्गेश कैलास परदेशी याने त्याच्या हातातील चाकुने भाऊ विशाल परदेशी यांच्या पाठच्या डाव्या बाजुस चाकू मारुन जबर दुखापत केली. यावेळी श्रीकांत धनगर व दुर्गेश परदेशी आमच्या नांदी लागले तर जिवंत सोडणार नाही याद राखा अशी धमकी देवुन पळुन गेले. दोन्ही भावांवर उपचार सुरु असून मिथुन याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तातडीने एमआयडीसीच्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, पोहे.कॉ अल्ताफ पठाण, गफूर तडवी, राहुल रगडे विशाल कोळी, संदीप धनगर, यांनी तातडीने दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या