जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या वतीने नुकताच एक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गेल्या काही महिन्यांत विविध संस्था, कंपन्या आणि कार्यालयांनी रक्तदान शिबिरे घेऊन समाजासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून सौ. इती पांडे (IRTS, 1996 बॅच), विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ (भारतीय रेल्वे) या उपस्थित होत्या. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे व शिबिर आयोजकांचे कौतुक केले आणि त्यांचे कार्य भविष्यातही असेच सुरू राहावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे थॅलेसीमिया रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण आणि आपत्कालीन गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली, असे आयोजकांनी सांगितले. भारतीय रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांनी सर्व नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी आपल्या संस्था, कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून समाजसेवेचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर आयोजनासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: 0257-2226233