Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकसारा स्थानकामध्ये सहा नव्या गाड्यांना थांबा; कसारा स्थानकाचे महत्त्व वाढणार...

कसारा स्थानकामध्ये सहा नव्या गाड्यांना थांबा; कसारा स्थानकाचे महत्त्व वाढणार…

मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह:- मध्य रेल्वेनं कसारा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून देशभरातील विविध गाड्यांना काही ठिकाणी नव्यानं थांबे देण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आलेले आहेत. कसारा येथून प्रवास उत्तर भारतात, मराठवाड्यात आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. कसारा स्थानकामध्ये सहा नव्या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळं कसारा स्थानकाचं महत्त्व वाढणार आहे. कसारा स्थानकामध्ये २३ ऑगस्टपासून एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराजस्थानक, मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या