भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ड्युटी बजावत असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना साकेगाव नजीक घडली.याबाबत भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन हरीशंकर सोनार (वय ४२, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ वाघूर नदीच्या अलिकडे खांब क्रमांक ४४८/ ७-९ मध्ये रेल्वे लाईनीवर नितीन सोनार यांचा मृतदेह आढळला. तसेच रेल्वे रूळाच्या बाजूला त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ५५१७) उभी होती.कर्मचाऱ्यांना सोनार यांचा मृतदेह आढळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती कळवली.तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉ.मयूर चौधरी यांनी पोस्ट मार्टम केले.भुसावळ तालुक्याचे हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, रसीद तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शेख निसार शेख उमर यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मीक सोनवणे, हे करीत आहेत.