Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअसोदानजीक साईबाबा मंदिर साकारले जाणार ; भूमिपूजन व नामफलकाचे अनावरण सोहळा उत्साहात

असोदानजीक साईबाबा मंदिर साकारले जाणार ; भूमिपूजन व नामफलकाचे अनावरण सोहळा उत्साहात

जळगाव/प्रतिनिधी –
माऊली द्वारकाधीश फाऊंडेशनच्यावतीने असोदा येथे साईबाबा दरबार ( मंदिर ) उभारण्यात येणार आहे.
असोदा रस्त्यावरील गट नं.१९५० पेट्रोल पंप व भारत गॅस गोदमामागे साईबाबा मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
भूमिपूजन दिलीप पाटील ( कोळी ), सार्वजनिक विद्यालयाचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते विलास चौधरी, दानशूर व्यक्तिमत्त्व पी.झेड.नारखेडे सर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विशाल सांगोळे ,रामानंद कुलकर्णी ,मिलिंद पाटील यांची उपस्थिती होती.


प्रारंभी साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर साईबाबा दरबार ( मंदिर ) या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरणही पाहुण्यांच्या हस्ते झाले. साईबाबा यांच्या जीवनावर आधारित विविध भजने व गाणी यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील अनेक साईभक्तांनी याप्रसंगी हजेरी लावली. या भूमिपूजन व फलक अनावरण सोहळ्याचे बहारदार व वेगळ्या धाटणीत सूत्रसंचालन जळगावचे जेष्ठ पत्रकार, कलावंत व प्रसिध्द निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले आणि मनोगत देखील व्यक्त केले.
या सोहळ्याचे आयोजन माऊली द्वारकाधीश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद हरी वाघ , उपाध्यक्ष स्वप्नीलकुमार भावसार , सचिव व प्रसिद्ध चित्रकार योगेश सुतार , सहसचिव सौ. योगिता वाघ ,तसेच कार्यकारिणी सभासद सौ.रुपाली नाना सोनवणे ,सौ.सुनीता रमेश सुतार , डॉ.हेमंत प्रल्हाद नारखेडे , कलावंत सुरेश राजपूत ,विजय सुदाम पाटील आदींनी केले.या मंदिराच्या निर्माणासाठी अनेक दात्यांनी सढळ हाताने,मनोभावे सहकार्य करण्याची अपेक्षा अनेकांनी बोलून दाखवली.
या कार्यक्रमासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. आभार योगेश सुतार यांनी मानले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या