जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- समाजातील शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा, आरोग्य, शेती, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा ‘सकल ज्ञान महोत्सव – सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे उत्साहात संपन्न होणार आहे. हा उपक्रम यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करीत असून ज्ञानाचा सन्मान व सेवाभावाचा गौरव हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माजी डायट प्राचार्य मा. श्री. निळकंठ आप्पा गायकवाड उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार मा. श्री. राजुमामा भोळे विराजमान राहतील. यावेळी नवनिर्वाचित महापौर सौ. दिपमाला काळे तसेच माजी महापौर व नगरसेविका मा. श्री. जयश्रीताई महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती राहणार असून त्यात मा. श्री. विजय पवार, मा. श्री. मनोज पाटील, केतकीताई पाटील, प्रो. रफिक शेख, सौ. भारतीताई काळे, मा. श्री. सुनील जयसिंग पाटील, अॅड. निखिल पाटील, संघपाल तायडे, सौ. अर्चना माळी तसेच सौ. नीताताई मंगलसिंग सोनवणे यांचा समावेश आहे.या प्रसंगी शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, पत्रकारिता, शेती, क्रीडा व पर्यावरण आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ज्ञानवंत मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, पत्रकार, समाजसेवक, आरोग्यदूत, शेतकरी व खेळाडू अशा विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. किशोर पाटील सर व सौ. ज्योतीताई राणे यांचे विशेष सहकार्य लाभत असून जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व वृत्तपत्र प्रतिनिधी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.ज्ञानाचा गौरव, सेवाभावाचा सन्मान आणि समाजाला प्रेरणा देणारा हा महोत्सव जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे आयोजकांनी सांगितले. सर्व सन्मानार्थींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जन्मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, सचिव हर्षाली पाटील तसेच मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीताताई सोनवणे यांनी केले आहे.

