Friday, March 20, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासाकेगावचा गौरव पाटील ऑस्ट्रेलिया सरकारच्या DIT विभागात उच्च पदावर विराजमान

साकेगावचा गौरव पाटील ऑस्ट्रेलिया सरकारच्या DIT विभागात उच्च पदावर विराजमान

भुसावळ | प्रतिनिधी | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील गौरव संजय पाटील या युवकाने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये उच्च पद मिळवून गावाचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे जाण्याचा निर्धार करत गौरव पाटील यांनी स्वामी नारायण गुरुकुल येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पूर्ण करून पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेतले. काही काळ बेंगळुरू येथे नोकरी करत असताना उच्च शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड विद्यापीठात प्रवेश घेतला.तेथे मास्टर ऑफ सायन्स पदवी उत्कृष्ट गुणवत्तेसह संपादन केल्यानंतर त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांची डिपार्टमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट (DIT) या महत्त्वाच्या विभागात उच्च पदावर नियुक्ती केली आहे.

गौरव पाटील यांच्या या यशामुळे साकेगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ‘स्मार्ट व्हिलेज साकेगाव’च्या वतीने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.गौरव पाटील हे उत्कृष्ट क्रिकेटपटू असून अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जातात. ते भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय निवृत्ती पाटील व विद्यमान संचालिका माधुरी पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या