Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeरावेरछत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर तांदलवाडी येथे उत्साहात..

छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर तांदलवाडी येथे उत्साहात..

सावदा | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- तांदलवाडी ता.रावेर येथे महसूल सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचे लाभ थेट नागरिकापर्यंत पोहोचविण्यात आले. शासन आपल्या दारी ह्या संकल्पनेतून विविध शासकीय योजना,प्रमाणपत्रे, तक्रार निवारण तसेच इतर महसूल विषयक सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात तसेच नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.

‘या शिबिरात शासकीय पदाधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी गटशिक्षणाधिकारी महसूल अधिकारी आणि इतर तालुकास्तरीय शासकीय अधिकारी तसेच भाजपा लोकसभा प्रमुख नंदूभाऊ महाजन यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या