Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeमलकापूरसमग्र फाउंडेशन संचलित समग्र ग्राम शिक्षा प्रकल्प ; जळगाव-धुळे जिल्ह्यातून १००० हून...

समग्र फाउंडेशन संचलित समग्र ग्राम शिक्षा प्रकल्प ; जळगाव-धुळे जिल्ह्यातून १००० हून अधिक बेरोजगारांना रोजगार संधी मिळणार !

सक्षम तरुण – सक्षम गाव – सक्षम भारत या ध्येयाने भारतभरात विशेष सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या समग्र फाउंडेशनच्या माध्यमातून ‘समग्र ग्राम शिक्षा प्रकल्प’ सुरु करण्यात आला आहे.

मलकापूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्था म्हणून परिचित समग्र फाउंडेशन अंतर्गत राबविला जाणारा समग्र ग्राम शिक्षा प्रकल्प ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाचे सुवर्ण संधी उपलब्ध करून देतो. संस्थेच्या माध्यमातून देशभरात एकूण १ लाख ११ हजार गरिब आणि दुर्बल घटकातील परिवारांना लाभ उपलब्ध करून देण्याचा मोठा संकल्प घेतला आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या आणि रोजगाराच्या संधीच्या अभावाने ग्रस्त अशा परिवारांना या प्रकल्पाद्वारे शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची गारंटी दिली जाणार आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील १००० हून अधिक महिलांना, पुरुषांना आणि शिक्षकांना रोजगार संधी उपलब्ध…
समग्र फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव व धुळे जिल्ह्यातून १००० पेक्षा जास्त महिलांना, पुरुषांना आणि शिक्षकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प अंतर्गत खालील प्रमाणे प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

शिक्षण आणि कौशल्य आधारित अभ्यासक्रम:-
> स्वयंरोजगार प्रशिक्षण.
> आत्मरक्षा प्रशिक्षण.
> संगणक टायपिंग कोर्स.
> टॅली प्राइज कोर्स.
> ऍडव्हान्स एक्सेल कोर्स.
> ग्राफिक डिझाईन कोर्स.
> एम एस ऑफिस कोर्स.
> ब्युटी पार्लर कोर्स.
>फॅशन डिझाईन कोर्स.
> स्पोकन इंग्लिश कोर्स.
> मेहंदी आर्टिस्ट कोर्स.
> शिलाई मशीन प्रशिक्षण.
> स्वसंरक्षण लाठीकाठी प्रशिक्षण.
> स्वालंबन प्रशिक्षण. (कौशल्य आधारित)
> याशिवाय खालील विशेष सुविधा देखील मोफत उपलब्ध.
> तालुक्यात एक ग्राहक सेवा केंद्र.
> मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.
> मोफत विमा व मेडिक्लेम सपोर्ट.
> विद्यार्थ्यांसाठी नोकरी नियुक्तीसाठी समर्थन.
> मोफत करिअर समुपदेशन.
> वित्त व बँकिंग साक्षरता प्रशिक्षण.
> मोफत कौशल्य विकास मार्गदर्शन.
> एक तालुका एक प्लेग्रुप स्कूल.
>एक जिल्हा एक गुरुकुल निवासी शाळा.
> शैक्षणिक साहित्य व नोटबुक वितरण केंद्र.
> वाचनालय सुविधा.
> शेती अवजारांवर ३०% अनुदान.
> युवक व शेतकऱ्यांसाठी कर्ज सहाय्य.
> स्मार्ट शिक्षा ऑनलाईन लर्निंग पोर्टल. (सर्टिफिकेट सह)

शैक्षणिक व आर्थिक लाभासाठी पालकांना केवळ ७७००/- रुपयांचा योगदान…या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी पालकांना फक्त एकदा २४ महिन्यांसाठी एकूण ७७००/- रुपये डोनेशन भरावे लागणार आहेत.

पालकांना पूर्ण सुविधा देण्यासाठी विविध पेमेंट पर्याय उपलब्ध.

> एकदा संपूर्ण रक्कम भरावी.
> सहा महिन्यांनी डोनेशन भरता येईल.
> दर वर्षी डोनेशन भरण्याचा पर्याय.
> दर महिन्याला फक्त ३००/- रुपये हप्त्याने भरता येईल.
> यामध्ये ९६.१५% अनुदानित उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे आव्हान…
संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सपोर्ट देऊन त्यांना समाजात सक्षम नागरिक बनविण्याचे विशेष आव्हान करण्यात आले आहे.

संस्थेचे उद्दिष्ट –
सक्षम तरुण – सक्षम गाव – सक्षम भारत
या-अंतर्गत अधिकाधिक परिवारांना प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आव्हान संस्थेने दिले आहे.

अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी समग्र फाउंडेशन कार्यालयाशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या