जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि ५ सप्टेंबर २०२३ रोजी संध्या ६:३० वा. गुजराल पेट्रोल पंप, अण्णासाहेब पाटील नगर, जळगाव येथून आठ वर्षाचा टीशर्ट घातलेला बालक घरून निघुन गेलेला आहे, अशी माहिती जळगाव आर.पी.एफ ला मिळाली.आर.पी.एफ चे सहायक उपनिरीक्षक शिवपूजन सिंह साहेब यांनी लागलीच केशव स्मृती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदिप पाटील यांना बोलवून या बालकाला शोधण्यास सांगितले. हा मेसेज मिळताच आर.पी. एफ जवान व समतोल टीमचे जवान यांनी तात्काळ रेल्वस्थानकावर सर्व येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन चेक करीत प्लॉट फॉर्म चेक करणे सुरू ठेवले. व काही वेळातच आर.पी.एफ चे उपनिरीक्षक शिवपूजन सिंह साहेब व समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदिप पाटील, विश्वजीत सपकाळे, व टीम सदस्य यांनी या बालकाला शोधून काढले. बालकाचा शोध घेतल्यावर बालकाला नाष्टा वगेरे देऊन बालकाचे समुपदेशन करण्यात आले. मिळालेल्या माहिती नुसार बालक हा जास्त बोलत नव्हता. कुठली ही माहिती सांगत नव्हता. त्या बालकाला काही ही सांगता येत नव्हते, मुलगा फारच डिप्रेशन मध्ये दिसत होता. पण त्याला मोबाईल दिल्यावर त्याला पब्जी गेम खेळणे समजत होते. मोबाईल दिल्यावर मोबाईल परत ही करीत नव्हता, त्या पब्जी गेम मध्ये बालक हा व्यस्त झालेला दिसून येत होता. ग्रुप वर टाकलेला मेसेज हा अनेक ग्रुप वर फॉरवर्ड होत होता. याचे भान ठेवून प्रदिप पाटील यांनी मेसेज मध्ये दिलेल्या संपर्क नंबर वरती कॉल केला. कॉल वर सांगण्यात आले की, तुमचा मुलगा सुरक्षित जळगाव रेल्वे स्थानक येथील समतोल बाल सहायता केंद्र आमच्या NGO कडे आहे. तेवढ्यात बालकाचा परिवाराने रेल्वे स्थानक गाठले. आई-वडील यांनी बालकाला पाहताच हंबरडा फोडला. व बालक ही लगेच आईच्या कुशीत गेला. मुलगा आता आई वडिलांना सोडायला ही तयार नव्हता. अश्या वेळी घडलेली सर्व माहिती बालकल्याण समितीला कळवण्यात आली. समितीच्या आदेशाने आई वडिलांचे व मुलाचे आधारकार्ड, कागदपत्रे तपासणी करून प्रोसेस करून समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून बालकाला सुरक्षित परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. घरात बालकाला मोबाईलच लागतो, मोबाईल नाही दिला तर नाटके करतो, डिप्रेशन मध्ये असतो, चिडचिड पणा करतो, त्याची डॉक्टरांकडे नियमित तपासणी सुरू आहे. बालकाला खेळायला मोबाईल न मिळाल्यामुळे बालकाने घरच सोडले, अशी सर्व माहिती पालकांकडून मुलाला ताब्यात देतेवेळी मिळाली. यावेळी पालकांना मोबाईलचे मुलांवर होणारे दुष परिणाम सांगण्यात आले. पण मुलगा हा मोबाईल शिवाय राहतच नाही अशी माहिती समोर येत आहे. मोबाईलचे वाईट परिणाम मुलावर झालेले दिसून येत आहेत. कर्मचारी यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले व परिवाराची समज काढली. या उल्लेखनीय कार्याबद्दल बालकाच्या परिवाराने आर.पी.एफ व समतोल प्रकल्पाचे कर्मचारी यांचे आभार मानले. या कार्याबद्दल आर.पी.एफ.व केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाचे कर्मचारी यांचे समाजातील सर्वस्तरातून कौतून होत आहे.
मोबाईल न दिल्यामुळे मुलाने गाठले रेल्वे स्थानक; समतोल प्रकल्प व आर पी एफ च्या उल्लेखनीय कामगिरीने मुलगा ताब्यात..!
RELATED ARTICLES