Tuesday, February 17, 2026
police dakshta logo
Homeजळगावसंघपाल तायडे या खाकी वर्दीतील सुरेल गायकाचा गौरव ; त्यांना ‘उत्कर्ष कलाविष्कार’...

संघपाल तायडे या खाकी वर्दीतील सुरेल गायकाचा गौरव ; त्यांना ‘उत्कर्ष कलाविष्कार’ सन्मान जाहीर!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची देणारे खाकी वर्दीतील गायक संघपाल तायडे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खान्देशातील कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारामुळे कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पुरस्कार उपक्रमाची सुरुवात यंदा खान्देश नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन Obenol Foundation या संस्थेमार्फत करण्यात आले होते. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री Sanjay Savkare, तसेच अश्विनकुमार परदेशी, मोहन फालक, नम्रता परदेशी, राधेश्याम लाहोटी आणि शकील हसरत यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन तायडे यांचा गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना मंत्री सावकारे यांनी तायडे यांच्या गायनाची राज्यासह देशभरात चर्चा होत असल्याचे सांगितले. त्यांच्या कलेमुळे जळगाव जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.पुरस्कार स्वीकारताना तायडे यांनी हा सन्मान आपल्या मातीचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. पोलिस सेवेबरोबरच कलाक्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला खान्देश परिसरातील कला रसिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि पोलिस विभागातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तायडे यांच्या संगीत प्रवासाचा आढावा सादर करण्यात आला आणि त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या