जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- संस्कृती माध्यमिक विद्यालयात आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लिनेस क्लबच्या अध्यक्ष सौ. रेशमाजी बेहेराणी, ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी सौ. विजयाताई बाफना, जय दुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष व जळगाव नगरीच्या माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन तसेच कृ. उ. बा. समितीचे माजी अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर दादा नाईक यांची उपस्थिती लाभली.
ध्वजपूजनानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. शाळेतील लहानग्यांनी विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत हजेरी लावून कार्यक्रमाला आकर्षक रंगत आणली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, नृत्य व भाषणांच्या आकर्षक सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले.