Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावसरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे; मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही :...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे; मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

जळगाव/तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.”दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असतांना सरकारकडून काहीही मदत होत नाही. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे !” अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. ते आज जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.खडसे यांच्या मुक्ताई या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ.एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री यांच्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही. राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे व जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. मंत्री मंडळात जे एकत्र बसतात, त्यांनी एकमुखाने भूमिका मांडली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. मंत्री मंडळातील मंत्री आतमध्ये बसून भूमिका मांडण्यास कमी पडत आहेत म्हणून त्यांना बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे सर्व ठरवून सुरु आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो.ओबीसींच्या बाबतीत आणि मराठ्यांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने स्पष्ट केले पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.

कोणताही विषय आला तर सध्याचे सरकार महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवते. मविआ म्हणून आम्ही सर्व मित्र पक्ष एक दिलाने काम करत आहोत. राज्यावर कोरोनाचे सावट असतानाही मविआ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आज सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जात आहेत. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, तर पिकांवर वेगवेगळे रोग पसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पीक विम्याचे पैसे जर दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिले नाही तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असे मंत्र्यांचे म्हणणे होते. मात्र, पुढे तसं काहीच झालेलं दिसलं नाही ,असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र परिषदेत सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या