जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य मयूर अनिल वाघुळदे गेल्या १0 वर्षापासून वन्यजीव रक्षक आणि सर्प वाचवण्यासाठी दिवसरात्र कार्य करीत आहेत. रस्त्यावरती फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना व वन्यजीव वाचवण्यासाठी अर्धरात्री झटणारे सर्पमित्र मयूर वाघुळदे यांच्या कामाची दखल घेऊन हजरल बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.मयुरचे पोलीस दक्षता लाईव्हचे संपादक चंदन पाटील ,कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे आणि टीम ने अभिनंदन केले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून जळगावमध्ये कुठेही सर्प अथवा प्राणी पक्षी आढल्यास सर्पमित्र मयूर वाघुळदे यांच्याशी संपर्क करा.
संपर्क – 8999441779