नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. या निमित्ताने दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रत्नाकर भाऊ पांढरकर होते. यावेळी कार्याध्यक्ष जनार्दन माळी, संचालक मिठाराम म्हसकर, राजेश्वर धर्माधिकारी, डॉक्टर प्रमोद आमोदकर, सचिव प्रदीप देशपांडे, जितेंद्र पाटील, बंडू खंडारे सर तसेच वाचनालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला.

