फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, फैजपूर येथे सतपंथ कला केंद्र प्रस्तुत “बाल कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे स्मृती चषक” या विशेष कार्यक्रमाला प.पु. गुरुवर्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज (गादीपती, सतपंथ मंदिर फैजपूर) यांच्या पावन उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी यावल व रावेर तालुक्यांतील बाल आणि युवा कलाकारांनी विविध सांस्कृतिक, कलात्मक व सर्जनशील सादरीकरणे प्रस्तुत केली.
यावल आणि रावेर तालुक्यातील बाल आणि युवा कलाकारांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठासोबतच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सतपंथ कला केंद्र यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी आणि प्रतिभेला चालना देणाऱ्या प्रयत्नांसाठी सतपंथ कला केंद्र आणि ग्लोरियस डान्स अकॅडमी फैजपूर यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.. याप्रसंगी आमदार अमोल जावळे आणि मान्यवर उपस्थित होते.