Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमबनावट ईमेलद्वारे कोर्टाच्या कारवाईची धमकी; नागरिकांनी सावध राहावे!

बनावट ईमेलद्वारे कोर्टाच्या कारवाईची धमकी; नागरिकांनी सावध राहावे!

आपला विश्वास, आपले संरक्षण; पोलिस प्रशासन तुमच्यासोबत – “महाराष्ट्र पोलिस.”

पुणे/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- सायबर गुन्हेगारांनी बनावट सरकारी ईमेलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना धमकावण्याचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. “ICB-IPHQ/2024 COURT ORDER” या शीर्षकाखाली पाठवले जाणारे ईमेल सध्या नागरिकांच्या इनबॉक्समध्ये आढळत आहेत. या ईमेलमध्ये CBI, R&AW किंवा सायबर क्राइम विभागाच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना सांगितले जाते की, त्यांच्या इंटरनेटचा गैरवापर झाला असून कोर्टात कारवाई होणार आहे.सायबर सुरक्षा यंत्रणांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे की हा ईमेल पूर्णपणे बनावट असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.”सरकारी यंत्रणा अशा प्रकारे ईमेलद्वारे धमक्या देत नाहीत,” असे सायबर क्राइम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकृत नोटीसेस नेहमी पोलीस स्टेशनमार्फत किंवा अधिकृत पत्राद्वारे दिल्या जातात.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:

अशा कोणत्याही ईमेलमधील लिंक, अटॅचमेंट्स उघडू नका.

तुमची वैयक्तिक माहिती – OTP, पासवर्ड, Aadhaar, PAN – कोणी मागितल्यास न देता त्याची तक्रार नोंदवा.

तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाईन 1930 वर संपर्क करा.

अधिकृत वेबसाईटवर तक्रार करा – www.cybercrime.gov.in

प्रशासनाचा नागरिकांना संदेश:
“जागृत नागरिकच सायबर फसवणुकीपासून स्वतःचा आणि समाजाचा बचाव करू शकतो. अशा प्रकारच्या बनावट ईमेलच्या जाळ्यात अडकू नका. फसवणुकीची शंका आल्यास त्वरित तक्रार करा,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सायबर सुरक्षिततेसाठी तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवा:

शंका येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर लगेच कृती करू नका.

तुमचे पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा.

सतर्क राहा आणि इतरांनाही माहिती द्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या